वाढदिसानिमित्त शैलेश लाहोटी (उपविभागीय अधिकारी) यांची पाथरी येथील साईबाबा जन्मस्थान मंदिराला भेट

वाढदिसानिमित्त शैलेश लाहोटी (उपविभागीय अधिकारी) यांची पाथरी येथील साईबाबा जन्मस्थान मंदिराला भेट 



(प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी/ परभणी वाढदिवसानिमित्त शैलेश लाहोटी (उपविभागीय अधिकारी पाथरी) यांनी त्यांचे पिताश्री श्रीनिवास लाहोटी, मातोश्री लीना लाहोटी , सुकन्या गिरीजा, यांचे समवेत परमपूज्य साईबाबांचे श्रद्धापूर्वक भक्ती भावाने दर्शन घेतले. श्रीसाई स्मारक समिती ट्रस्ट, पाथरी च्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने  एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, त्यांचे आदरपूर्वक यथायोग्य स्वागत करून त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. मंदिर अधिक्षिका सौ छाया कुलकर्णी, सौ लीना लाहोटी, लक्ष्मी नागठाणे वगैरे यांनी

 यांचे औक्षण केले व त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. 


परमपूज्य साईबाबा शिर्डी येथे द्वारकामाईत स्वतः तांदळाची खिचडी करीत असत  साईबाबा स्वतः  खिचडी करीत असत व भक्तांना प्रसाद म्हणून वाटत असत. 

या प्रसंगाची ' हंडी बाबा ' मूर्तीचे मॉडेल तयार करण्यात आलेले आहे. त्या मॉडेल चे उद्घाटन याप्रसंगी आदरणीय शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी पाथरी यांचे हस्ते करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या