अतिक्रमण हटण्यासाठी तहसील समोर आमरण उपोषण,गायरान, मुस्लिम कब्रस्तानची जमीनीसाठी राहणार ऊपोषन सुरुच.
मुनीर शाह खुलताबाद प्रतिधान :- खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन ग्रामपंचायत अंतर्गत गट क्रमांक पाच, शासकीय गायरान शेत जमीन मुस्लिम कब्रस्तान चार हेक्टर शेतजमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण कब्जा करुन विनापरवानगी बांधकाम हटवून तहसीलने जागा ताब्यात घेण्यासाठी उपसरपंच सुनील घुसळे यांच्यासह नागरिक गुरूवारपासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत. कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषण सुरुच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
४० आर असा नमुना नंबर
आठ अ चा ग्रामपंचायतींच्या उताऱ्यावर खोटी नोंद घेतली होती. त्याचे फेरफार रद्द झालेला आहे. तर मासीक बैठकीत बेकायदेशीर पारीत ठराव रद्द करण्यात आलेला आहे. त्यात शाळा म्हणून स्कॉलर इंग्लिश स्कूल मुस्तफा फारुखी यांनी नावाला उघडलेलेले असून सुलिभंजन तथा तालुक्यांतील मुले विद्यार्थी शिक्षण घेत नाहीय. फक्त गायरान शेत जमीन मुस्लिम कब्रस्तान जागा हडपण्यासाठीचा यामागचा हेतू असून प्रशासनाने तातडीने कारवाई करुन जमीन ताब्यात घ्यावी. नसता आमरण उपोषण सुरुच राहील असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.


0 टिप्पण्या