पेठपिंपळगाव - मुदखेड - सिपेगाव रस्त्यांची प्रतीक्षा अखेर संपली*
पालम प्रतिनिधी :- गेल्या कित्येक वर्षा पासुन पालम तालुक्यातील तांबूळगाव, मुदखेड आणि सिपेगाव ह्या तीन गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या प्रतीक्षेत तिन्ही गावाचे लोकं होते. *अखेर खा. संजय जाधव यांच्या प्रयत्नातुन हि प्रतिक्षा संपली*
मागच्या वर्षी गावातील लोकांनी आंदोलन केले होते ह्या वेळी खासदार संजय जाधव यांनी गावकऱ्यांना शब्द दिला होता. रस्ता पुर्ण करुन देईल आणि आज दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खासदार संजय जाधव यांनी कार्यक्रमाचं भूमिपूजन करुन दिलेला शब्द पुर्ण केला. ह्या वेळी बोलताना संजय जाधव म्हणाले की ह्या नंतर गावातील मुलभूत विकासा साठी मी नेहमीच कट्टीबद्द आहे. ह्या संजय जाधव यांचा तिन्ही गावाच्या लोकांकडून सत्कार करण्यात आला....
हया वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानी खा. संजय जाधव , तर अध्यक्ष बळीराम जी भागवत होते. कार्यक्रमासाठी पालम न.प नगररध्यक्ष वसंत काका सिरस्कर, गटनेते भास्करराव सिरस्कर , शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत कराळे , मा. सभापती विजय कुमार शिंदे, पालम तालुका काँग्रेस कमीटीचे तालुकाध्यक्ष कृष्णा भैय्या भाऊसाहेब भोसले, गंगाखेड ता पृ अनिल सातपुते हनुमंत पौळ , अर्जुन डोंगरे.शिवाजी खंडागळे, सरपंच व्यकंट गरुड, ओंकार सिरसकर किशोर घोरपडे शे मुकरम साहेबराव सुरनर साहेबराव उगले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच आयोजन
शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत भागवत, मा.सरपंच अनंत राव कवडे, सरपंच गजानन कवडे, उप सरपंच सोपान भागवत, चेअरमन कैलास भगवत , मा. उप सरपंच पांडुरंग कवडे, अशोक भागवत, दत्ता कवडे, गोविंद भागवत, मा. सरपंच बापुराव कवडे, साहेब ससाणे, आदी नी केलं होत. वेळी कार्यक्रमाच सूत्रसंचालन कृष्णा भागवत यांनी केले.


0 टिप्पण्या