संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आज संपन्न
परभणी प्रतिनिधी :- दि 17 जाने. आज संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली यावेळी परभणी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख आदी सह समितीचे सदस्य 1) श्री दशरथ प्रभाकर राठोड
2) श्रीमती नंदाताई गोपीनाथ राठोड उपस्थित होते
यावेळी उपस्थिती सदस्य दशरथ राठोड यांनी जिल्ह्यातील विकास कामाबद्दल आणि जिल्ह्यातील तांडा मध्ये भेट देऊन तांड्याचा भरत आराखडा कशाप्रकारे भरून घेतलेला आहे यावर सविस्तर चर्चा केली जिल्ह्यातील तांड्यामध्ये भेट देऊन डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाला कोणत्या मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे या विषयावर चर्चा केली जिल्ह्यातील काही तांड्यांना आजपर्यंत रस्ता देखील उपलब्ध नाही म्हणून ताड्यापासून ते रस्त्यापर्यंत 5 किलो मीटर अंतरापर्यंत रस्ता कशाप्रकारे आणता येईल जिल्हाधिकारी साहेबांसोबत सविस्तर चर्चा केली
सोबतच परभणी जिल्ह्यातील 263 तांड्यामधून ज्या तांड्या मध्ये 700 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे असा तोंडाला महसूल दर्जा व नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिले


0 टिप्पण्या