ममता कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !
पालम प्रतिनिधी :- पालम येथील ममता कनिष्ठ महाविद्यालयात ओम साई इन्फोटेक व ममता महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि पालक यांना JEE, NEET आणि MHTCET विषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रयाग मार्गदर्शन केंद्राचे संचालक मा.श्री उद्धवराव देशमुख सर यांनी मेडिकल प्रवेशा संदर्भात मार्गदर्शन केले .गरीब आणि होतकरू मुलांना मदतीचा हात देण्याचे आश्वासनही दिले. तसेच प्रयाग मार्गदर्शन केंद्राचे संचालक माननीय श्री .अभिजीत अलाहाबादे सर यांनी इंजिनियरिंग प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . टाकळे एस. डी .यांनी केले .या कार्यक्रमाचे ममता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंभोरे एस.एम.हे अध्यक्ष होते .तसेच शिवनेरी महाविद्यालयाचे प्राचार्य घोगरे आर.सी .तसेच परिवर्तन क्लासेसचे श्री पोले एस. आर. दुधाटे क्लासेसचे श्री दुधाटे सर प्राचार्य भस्के आर. बी .उपस्थित होते .याप्रसंगी ममता कनिष्ठ महाविद्यालयातील सराव परीक्षेतील गुणांनुक्रमे कला वाणिज्य व विज्ञान शाखेतून प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय मस्के यांनी केले ,तर आभार श्री पौळ जी.डी.सर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पौल सर प्रा.पवार सर प्रा. सुर्वे सर प्रा. गायकवाड सर प्रा. जाधव सर यांनी प्रयत्न केले.


0 टिप्पण्या