पोलीस अधीक्षक . याच्या हस्ते शेख जाकेर याचा सत्कार.
मुनीर शाह बाजार सावंगी य्रतिनिधी :- खुलताबाद- पोलिस ठाण्याचे कार्यक्षम तरुण तडफदार हवालदार जाकेर शेख यांनी वेरूळ आवारात घडलेल्या खुनाच्या घटनेचा तपास करून खून करणाऱ्या गुन्हेगाराला पकडून कारागृहात पाठविल्यानंतर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)चे पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले. सन्मान दिला. शेख जाकेर यांनी विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे नाव लौकिक मिळवले आहे. पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी शेख ढाकेर यांनी भविष्यात असे चांगले काम करून पोलीस दलाचे नाव उंचावेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी शेख जाकेर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीसाठी आणि परिवाराकडून शुभेच्छा.


0 टिप्पण्या