थंडीचा कडाका आणखी वाढणार...'या' जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा.......
मुनीर शाह बाजार सावंगी,/खुलताबाद प्रतिनिधी :-डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थंडीचा ज्वर चढायला लागला असून आता राज्यात सर्वत्रच शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. राज्यात सर्वत्रच किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने येत्या तीन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
उत्तरेकडून हिमालयाच्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील
हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी राज्यात येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. विशेषकरुन मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होणार असून याठिकाणी
थंडीचा जोर वाढणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात वेगाने घट होणार आहे


0 टिप्पण्या