पोलीस शिपाई धुळगुंडे यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 पोलीस शिपाई धुळगुंडे यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार



पालम प्रतिनिधी :- लातूर जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या बापूराव व्यंकटी धुळगुंडे (वय ३५) यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता सादलापूर (ता.पालम) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी १० वर्षे सेवा बजावली आहे.


अहमदपूर पोलीस ठाण्यात धुळगुंडे कार्यरत होते. त्यांना बुधवारी सकाळी ६ वाजता हृदयविकाराचा झटका आला. लागलीच त्यांना उपचारासाठी अहमदपूर येथील एका खाजगी दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार करतेवेळी परभणी येथील पोलिसांनी मानवंदना दिली. यावेळी अहमदपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनर, पालमचे पोनि सुरेश थोरात, फौजदार गणेश सवंडकर, जमादार कल्याण साठे, शिपाई किशोर बनाटे, श्री. पठाण यांच्यासह आदी उपस्थित होते. पोलीस शिपाई धुळगुंडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, तीन बहिणी, असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या