प्रियदर्शनी ग्रामीण बिगरशेती महिला सहकारी पतसंस्थेची तेव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
केरवाडी :- प्रियदर्शनी ग्रामीण बिगरशेती महिला सहकारी पतसंस्था मर्यादित केरवाडी ता. पालम या पतसंस्थेच्या सभासदांची तेव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अधक्ष्य गंगाताई माने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यालय, स्वप्नभूमी केरवाडी या ठिकाणी शुक्रवारी, दि. 20 सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व संचालक मंडळ, यांचे संस्थेतर्फे अध्यक्ष सौ.गंगा माने यांनी स्वागत केले. सचिव श्रीमती शोभा कुलकर्णी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. ते इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच त्यांनी सर्व सभासद व भागधारक यांना संथेच्या कामकाजविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या प्रसंगी स्वप्नभूमी केरवाडी चे संचालक श्री सूर्यकांत कुलकर्णी यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले.
या सभेत संस्थेचे सभासद यांनी संस्थेच्या भरभराटीचे व प्रगतीचे कौतुक केले. संस्थेच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनीच सातत्याने चांगल्या प्रकारे प्रयत्न केल्यानेच आपली संस्था आज नावारूपाला आली असल्याचे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले. आभार प्रदर्शन गवळण शिंदे यांनी केले. या सभेला अध्यक्षा गंगा माने, उपाध्यक्षा चंद्रप्रभावती पांचाळ, सचिव शोभा कुलकर्णी, संचालक माणिकताई कुलकर्णी, लता सारंग, मनिषा गडमवाड, लता कवठेकर, विमल बडवने, राजूबाई एडके, कालिंदी जाधव, पंचफुला डुकरे, सिमा जाधव आदींसह सभासद, कर्मचारी वृंद, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गवळण शिंदे,मंगल शेटे,मीरा बडवने,दिपाली जाधव,गोपीनाथ शिनगारे यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या