बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी परिवर्तन जनसन्मान यात्रेचा आरंभ-रणबागुल
धाराशिव प्रतिनिधी :-भूम-वाशी तालुक्यातील मौजे सोनारवाडी येथून संत भगवान बाबा यांचे दर्शन घेऊन बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी परिवर्तन जनसन्मान यात्रेचा आरंभ झाला.भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.भु म परंडा वाशी तालुक्यातीत परिवर्तन जनसन्मान यात्राच्या माध्यमातून नागरिकांशी नेते प्रवीण रणबागुल संवाद साधणार आहेत.वाशी तालुक्यातील सोनारवाडी जुन्नर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे.या यात्रेमध्ये नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.या परिवर्तन जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जनतेची संवाद साधून नागरिकांशी संवाद साधून मी तुमच्या सर्व समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून मला येणाऱ्या काळात विधानसभा मध्ये भरभरून मत देऊन विधानसभेमध्ये पाठवावे तुमच्या सर्व समस्या ची गुरुकिल्ली म्हणजे सत्ता आहे.बहुजन समाजाच्या विविध प्रश्नावर आवाज विधानसभेमध्ये मांडण्यासाठी येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी विधानसभा लढवत आहे.
0 टिप्पण्या