श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी. या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा - 2 या अभियानामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक.

 श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी. या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा  - 2  या अभियानामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक.



पालम प्रतिनिधीं :- सोशियो इकॉनोमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट  स्वप्नभूमी संचलित, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी. या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा  - 2  या अभियानामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला आहे.

या अभियानामध्ये शाळेचे मूल्यमापन  पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी व शैक्षणिक संपादणूक या तीन पातळीवर करण्यात आले.

यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेची इमारत, रंगरंगोटी, भौतिक सुविधा शाळेतील प्रयोगशाळा, ग्रंथालय, ICT प्रयोगशाळा, सोलर पॅनलची व्यवस्था, वृक्ष संवर्धन, स्वच्छता गृह, महावाचन चळवळ विद्यांजली पोर्टल वरील शाळेचे काम, स्वच्छता मॉनिटर उपक्रम, इको क्लब, शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार वैधता, लोकसहभाग, विद्यार्थी अभिलेखे, शालेय दप्तर, परसबाग, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती ,नवोदय परीक्षा. निवडणूक साक्षरता तंबाखूमुक्त शाळा, स्काऊट गाईड उपक्रम, इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व विषयावर तपासणी झाली, परभणी जिल्ह्यातून मूल्यांकनासाठी आलेल्या जिल्हास्तरीय समितीने वरील मुद्द्यांच्या आधारे शाळेची  तपासणी केली या सर्व मुद्द्यांमध्ये शाळेने अव्वल स्थान पटकावले शाळेचा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये परभणी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे व शाळा विभाग स्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. मूल्यांकन समितीने शाळेचे, संस्थाचालकाचे व व्यवस्थापनाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थाचालक सूर्यकांत कुलकर्णी व माणिकताई कुलकर्णी ,अजिंक्य कुलकर्णी आशिष कुलकर्णी , सावनी ताई कुलकर्णी यांनी शाळेच्या सर्व टीमचे स्वागत केले. अभियानामध्ये शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पौळ सुरेखा चामले, उषा किरडे, उर्मिला कुगणे ,मनोज गडम वाड ,विद्या बडोले ,संगीता पौळ,पंकज कुलकर्णी ,संदीप गडगिळे ,कुंडलिक जाधव उर्मिला लोखंडे व लता गडगिळे, शिनगारे सर आणि अनिस सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. डी .आर. सारंग सर शाळेच्या सचिव गंगाताई माने . श्री.प्रल्हाद पांचाळ ,विष्णू जाधव, राम लटपटे . राजकुमार कोकाटे सर, विष्णू पांचाळ व तुकाराम पांचाळ व स्वप्नभूमी परिवारातील सर्व सदस्यांनी हे अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी श्रम घेतले, शाळेचे  व विद्यार्थ्याचे तालुक्यातून जिल्ह्यातून व पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या