शेख ज़ैतूनबी बाबामियाँ यांच्या वयाची शतक पूर्ती,नातेवाईकां कडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.
बीड प्रतिनिधी :- ज्येष्ठ नागरिक शेख ज़ैतूनबी बाबामियाँ यांनी आपल्या वयाचे शतक आज दिनांक 9 जुलै 2024 रोजी पूर्ण केले. याबद्दल त्यांच्यासह सर्व शेख कुटुंबीयांचे अभिनंदन होत असून त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या जात आहे.
शहरातील मुक्तपत्रकार एस.एम. युसूफ़ यांच्या आत्या तथा मरहूम पोलीस पाटील शेख बाबामियाँ यांच्या पत्नी शेख ज़ैतूनबी यांनी आज दिनांक 9 जुलै 2024 रोजी आपल्या वयाचे शतक पूर्ण केले. त्यांचा जन्म 9 जुलै 1924 रोजी अहेमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या चिचोंडी शिराळ येथे झाला होता. अहेमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या एकलहरे या गावातील पोलीस पाटील शेख बाबामियाँ यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना पाच मुले-सुना, दोन मुली-जावई, नातवंडे-पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्ताने बीड, चिचोंडी शिराळ, दर्गाह दायरा आणि एकलहरे येथील सर्व नातेवाईकांनी अभिनंदन केले असून यापुढेही त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या