सय्यदा हिबाचा वयाच्या पाचव्या वर्षी आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण

 सय्यदा हिबाचा वयाच्या पाचव्या वर्षी आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण 



बीड प्रतिनिधी :- सय्यद निसार शरीफ मियाँ यांची मुलगी सय्यदा हिबा हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा वयाच्या पाचव्या वर्षी पूर्ण केला.

सध्या पवित्र रमजान महिन्याचे रोज़े सुरू आहेत. रमज़ान महिना आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. सय्यदा हिबा हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला व तो यशस्वीरित्या पूर्ण केला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. तप्त उन्हामुळे भल्याभल्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. अशा अवस्थेत लहान मुली व मुले आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा धरत आहे. यामागे अल्लाहकडून रोज़ेदारांना मिळणारी अदृश्य ताकद असते म्हणूनच चिमुकले रोज़ेदार कमी वयातही आपले रोज़े पूर्ण करू शकतात. असेच सय्यद हिबा हिनेही वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण केला. याबद्दल पीर व मुरशीद हज़रत रौशनमियाँ, हज़रत महेमूद मियाँ, हज़रत नुसरत तनवीर मियाँ, हज़रत रेहान मियाँ यांच्यासह सर्व नातेवाईक, दर्गाह दायरा येथील सर्व रहिवासी यांनी अभिनंदन केले व त्याने यापुढेही दरवर्षी रमज़ान महिन्याचे पूर्ण रोज़े ठेवावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या