शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या फातिमाबी यांचे निधन
बीड प्रतिनिधी :- मूळच्या बीड शहरातील असलेल्या फातिमाबी आमिरखान पठाण यांचे वयाच्या ८० व्या वर्षी मंगळवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी वृद्धत्वाने निधन झाले.
बीड शहरातील जुना बाजार, लोहार गल्ली येथील फातिमाबी यांचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल गोंदी येथे नोकरीस असलेले आमिर खान पठाण यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना तीन मुली व एक मुलगा झाला. ही सर्व मुले लहान असतानाच त्यांचे पती आमिरखान यांचे ऑन ड्युटी अकस्मात निधन झाले होते. निधनापूर्वी ते जिल्हा परिषद हायस्कूल गोंदी येथे शिपाई या पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर चार लहान चिमुकल्यांचा सांभाळ व पालन पोषण करण्याच्या जबाबदारीसह पतीच्या जागेवर अनुकंपा धरतीवर नोकरी मिळविण्याची धडपड करावी लागली आणि त्यांना कालांतराने शाळेत सेवेत सामावून घेण्यात आले. तेव्हापासून सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी आपल्या तिन्ही लहान मुली व मुलाचे पालन पोषण एकट्यानेच केले. सर्वांची लग्ने लावून दिली. सर्व मुली दिल्या घरी सुखी आहेत तर पुत्र क़दीर खान पठाण हे अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत तसेच जालना जिल्हा गट सचिव संघटनेचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपासून फातिमाबी या वृद्धापकाळाने आजारी होत्या. त्यांच्यावर औरंगाबाद येथे एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले निधनानंतर त्यांचे पार्थिव औरंगाबादहून बीडला आणण्यात आले. येथे त्यांची नमाज़ ए जनाज़ा तकिया मस्जिद येथे पठण करण्यात आली तर दफनविधी मोमीनपुरा येथील महेदवीया दायरा कब्रस्तान येथे करण्यात आला. त्यांच्या दफनविधीसाठी जालना जिल्ह्यातील चिकनगाव, खेडगाव, अंबड, जामखेड, घनसावंगी येथील नागरिक तसेच मराठी समाजाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, बीड शहरातील सर्व नातेवाईक उपस्थित होते. पठाण कुटुंबीयांच्या दुःखात बीड जिल्हा विशेष संपादक एस.एम. युसूफ सह जनतेचा बातमीदार न्युज सहभागी आहे.


0 टिप्पण्या