सुपतगाव येथे श्री संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
उमरगा तालुका प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे रविवार दि. २४ मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे व ज्ञानेश्वरी पारायण वाचन यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गुरुवर्य शिवराम बुवा महाराज दिंडेगावकर व सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या कृपाशीर्वादाने गेली ६१ वर्षापासून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त हा सोहळा अखंडपणे चालू आहे. यंदाचे हे ६२ वे वर्ष आहे.
या पारायण सोहळ्यात व्यासपीठ अधिष्ठान म्हणून ह.भ.प शिवहार मुळे महाराज हे आहेत. या सोहळ्यात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी विष्णू सहस्त्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी संत तुकाराम गाथाभजन, सायंकाळी प्रवचन, नामजप, हरिपाठ तसेच रात्री चक्रीभजन हरिकीर्तन व हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामदैवत मारुती मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या सोहळ्यात विविध महाराजांची प्रवचने व कीर्तने आयोजित करण्यात आली आहे, रविवार दि.२४रोजी ह भ प बली बागल महाराज चिकुंद्रा यांचे प्रवचन तर ह भ प तुकाराम हजारे महाराज कोल्हापूरकर यांचे कीर्तन, सोमवार दि २५ रोजी ह भ प अन्नप्पा बिराजदार महाराज हिप्परगा यांचे प्रवचन, ह भ प श्रीहरी ढेरे महाराज काक्रंबा यांचे कीर्तन, मंगळवार दि. २६रोजी ह भ प बाबुराव पाटील महाराज चिंचोलीकर यांचे प्रवचन तर ह भ प प्रल्हाद सरडे महाराज तुळजापूरकर यांचे कीर्तन, बुधवार दि.२७रोजी ह भ प बालाजी मक्तेदार महाराज लोहारा यांचे प्रवचन ,ह भ प रामभाऊ गायकवाड महाराज चिकुंद्रा यांचे कीर्तन, गुरुवार दि. २८रोजी ह भ प सुरेश पाटील महाराज तोरंबा यांचे प्रवचन,ह भ प वैभव महाराज कानेगावकर यांचे कीर्तन, शुक्रवार दि. २९रोजी ह भ प .बाबा महाराज वानेगाव यांचे प्रवचन तर ह भ प गुरुवर्य महेश महाराज माकणीकर यांचे कीर्तन, शनिवार दि. ३०रोजी ह भ प शेखर सगर महाराज करवंजी यांचे प्रवचन ,ह भ प देविदास महाराज नितळीकर यांचे कीर्तन, रविवार दि. ३१रोजी ह भ प बाबुराव पुजारी महाराज पाडोळी यांचे प्रवचन तर ह भ प बालाजी सुरवसे महाराज कोराळकर यांचे कीर्तन, सोमवार दि. ०१एप्रिल रोजी स.९ वाजता पसायदान व दुपारी ह भ प गुलाब महाराज सुपतगावकर यांचे काल्याचे किर्तन व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. २७मार्च रोजी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज बीज दु. १२ वा गुलाल फुल बीज उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच ३१ मार्च रोजी नाथषष्ठी महोत्सव, दु. १२ वा श्री चा गुलाल, दि. १ एप्रिल रोजी नाथ महाराज काला वाटप होणार आहे.
तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मारुती देव मंदिर कमिटी व हनुमान भजनी मंडळ तसेच सुपतगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या