दिव्यांग विद्यार्थ्यांचे साहित्य मोजमाप शिबिर शिक्षकांनी जबाबदारीने घेऊन जावे - एस.एम.युसूफ़

 दिव्यांग विद्यार्थ्यांचे साहित्य मोजमाप शिबिर शिक्षकांनी जबाबदारीने घेऊन जावे - एस.एम.युसूफ़



बीड प्रतिनिधी - समग्र शिक्षा अभियानांतर्गत बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समावेशित शिक्षण सक्षमीकरण विभाग केंद्र, बीड कडून दिव्यांग विद्यार्थ्यांचे साहित्य मोजमाप शिबीर शनिवार दिनांक ०९ मार्च २०२४ रोजी सकाळी ०९:०० ते संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत बीड येथील जुनी पंचायत समितीच्या गट साधन केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. 


या मोजमाप शिबिरात प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना जबाबदारीने घेऊन जावे व शासनाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या संसाधनाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.



या शिबिरात बहुविकलांग, कर्णबधिर, सेरेबल पाल्सी, अस्थिव्यंग इत्यादी दिव्यांग विद्यार्थ्यांचे मोजमाप करण्यात येणार असून यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोजमापानुसार त्यांना आवश्यक असलेले संसाधन पुढे चालून शासनाकडून देण्यात येणार आहे. ज्यामध्ये व्हीलचिअर, कमोड चिअर, तीनचाकी सायकल, कुबडी, अंधकाठी, श्रवणयंत्र, रोललेटर इत्यादींचा समावेश असणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना या संसाधनाचा लाभ मिळावा याकरिता प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी जबाबदारीने या शिबिराची माहिती अंगणवाडी ते इयत्ता १२वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह पालकांनाही द्यावी. 



मोजमाप शिबिरात जाणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत, दोन पासपोर्ट साईज फोटो, दिव्यांग प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, प्रमाणपत्र नसल्यास यु.डी.आय.डी. पावतीची झेरॉक्स प्रत सोबत असणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या शिबिरात जबाबदारीने घेऊन जावे व मोजमाप करून घ्यावे असे आवाहन मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या