रविंद्र हायस्कूल सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत १००% निकाल.

 रविंद्र हायस्कूल सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत १००% निकाल.



१२ विद्यार्थी सैनिकी स्कूल प्रवेशासाठी पात्र,यावेळी विद्यार्थी व शिक्षक.


Join MS-CIT 
न्यू जनरेशनसाठी नव्या डिजिटल स्किल्स 
आता AI & ML सोबत 
अधिक माहिती साठी संपर्क करा
कौशल्या कॉम्प्युटर्स, पालम 
मो. 9822130898.


धाराशिव/भूम प्रतिनिधी :- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या रविंद्र हायस्कूलने सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेतही लावला 100% निकाल लागला असून यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली आहे.रविंद्र हायस्कूलचा सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला.यात रविंद्र हायस्कूलच्या परीक्षेत बसलेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थी सैनिकी स्कूल प्रवेशासाठी पात्र झाले. यामध्ये पात्र विद्यार्थी होळकर हिरणमई सचिन २१२ गुण,कोल्हे अनुश्री औदुंबर २०७ गुण,बोराडे राजलक्ष्मी आबासाहेब २०५ गुण,मोटे स्वरांगी संदीप १७४ गुण,जानकर वैष्णवी विलास१७२  गुण,हराळ संग्राम दत्तात्रय १६३ गुण,वाघमारे शौर्य गणेश १५८ गुण,साठे शरयू दत्तात्रय १५६ गुण,माळी दुर्वा गणेश १५५ गुण,वाघमारे कीर्ती बाळासाहेब १४० गुण,माळी सत्यजित भोलेनाथ १२४ गुण,शेंडगे समर्थ विजय १८४ गुण या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव आर.डी.सुळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.व प्रशालेच्या वतीनेही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या