जिल्हा परिषद हायस्कूल भूम येथे चॉकलेट मिलेट न्यूट्रेटिव्ह चॉकलेट बार यांचे वाटप.
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :- भूम येथील जिल्हा परिषद हायस्कूल भूम येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मिलेट न्यूट्रेटिव्ह चॉकलेटचे वाटप करण्यात आले . यावेळी विज्ञान शिक्षक पायघन यु पी यांनी या चॉकलेट संबंधी सविस्तर माहिती सांगितली . कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते . मुलांनी चॉकलेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला . शासनाकडून तीन प्रकारचे चॉकलेट बार प्राप्त झाले आहेत .काही चॉकलेट आठ दिवस तर काही नऊ दिवस वाटप करण्यात येणार आहेत . असे विभाग प्रमुख जोशी ए टी यांनी सांगितले .


0 टिप्पण्या