पाथरूड येथे एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न..

 पाथरूड येथे एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न..



भूम प्रतिनिधी :- तालुक्यातील पाथरुड येथे चि.तेजस तानाजी बोराडे या विद्यार्थ्यांने अश्विनी ग्रामीण रुग्णालय,सोलापुर व तसेच कु.ज्ञानेश्वरी मेघा शिवाजी चौधरी या विद्यार्थ्यांनी ने वैद्यकीय महाविद्यालय, पालघर या ठिकाणी एमबीबीएसच्या अंतिम वर्षी उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल पाथरुड ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार संपन्न झाला.



ग्रामीण भाग असताना सुद्धा संघर्ष,जिद्द व चिकाटीच्या बळावर त्यांनी प्राप्त केलेले हे यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत राहील असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख(ठाकरे) डॉ चेतन बोराडे,ज्येष्ठ नेते संजय बोराडे,सरपंच शिवाजी तिकटे,युवा उद्योजक भाऊसाहेब बोराडे,अरुण चव्हाण,अश्रुबा शेलवणे,भास्कर येडे,बप्पासाहेब जाधव,वसुदेव बोराडे,शेकर बोराडे,धण्यकुमार बोराडे,तात्या भोरे,सूरज झनझने,सूरज पवार,रोहन कोकने,अविनाश भोरे,तन्मय बोराडे,धनजय टिकते,महादेव पवार,रणजित बोराडे,डॉ.अश्विनी गोडसे- बोराडे, सौ.मनीषा बोराडे,राहुल मेहर,सौरभ बेडके,किरण बोराडे,नरेंद्र चौधरी यांच्यासह ईतर ग्रामस्थ व युवक बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या