शिवसेना उबाठा निष्ठावंत शिवसैनिक मुरलीधर आबा नागरगोजे यांची शिवसैनिकांना घेतली भेट.
धाराशिव प्रतिनिधी :- भूम तालुक्यातील जयवंतनगर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक मुरलीधर आबा नागरगोजे यांची भेट घेऊन त्यांची आडचण जाणून घेतली असता त्यांच्या घरावर लावलेले लाईटचे मिटर बंद असताना त्यांना जास्तीचे बिल आकारले जात आहे.ती सदरिल दिव्यांगाची होणारी पिळवणूक थांबवावी आशी मागनी संबंधीत विभागाकडे केली आहे.यावेळी विविध वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.खरोखरच निष्ठा काय असते ते भूम तालुक्यातील जयवंत नगर येथील मुरलीधर आबा नागरगोजे यांच्याकडून शिकावे मुरली आबा हे दिव्यांग आहेत.त्यांना कसलेही चालता येत नाही. काही वर्षापूर्वी तीन चाकी सायकल चालवत कोणत्याही ठिकाणी पक्षाच्या सभा बैठका ला उपस्थित राहत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर दहा-बारा निष्ठावंत शिवसैनिक सतत त्यांच्याबरोबर राहत होते.आता आबा पूर्णतः वयोमानानुसार घरामध्येच बसून आहेत.घरामध्ये बसून असतानाही ते पक्षाच्या हिताचे फोन द्वारे लोकांची कामे करतात.आबा हे एका ठिकाणी बसून असल्यामुळे त्यांच्या घरावर लावलेले लाईटचे मीटर बंद असतानाही त्यांना लाईटचे बिल आकारले जात आहे, ते तात्काळ दुरुस्त करून त्याच्या गटातटाच्या राजकारणात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडू नये अशी विनंती केली तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले.तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी संबंधित अधिकारी यांच्याकडे केली आहे.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर ,विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे,समन्वयक ॲड .विनायक नाईकवाडी . तालुका संघटक दिपक मुळे , लक्ष्मण नागरगोजे, तुळशीराम नागरगोजे , कोहीनुर सय्यद ,यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या