जलजीवन योजना नावाला,पाणी टंचाई गावाला,ग्रामपंचायत तांबुळगाव येथील कर्म कहाणी,खर खोट बघायला हाय कोणी.
परभणी प्रतिनिधी :- सविस्तर वृत्त असे की,गाव तिथ पाणी व्यवस्थापन करण्यासाठी पासस्ठ गाव पाणी पुरवठा योजने अंतर्गत पालम तालुक्यातील सर्व गावागावात जलजीवन योजना राबविण्यात आली,
याच योजनेचा लाभ मिळालेले तालुक्यातील तांबुळगाव हे एक गाव आहे. परंतू सत्य परिस्थिती मात्र वेगळीच दिसून येते,गावातील प्रत्येक घरासमोर पाण्याच्या तोट्या सोडल्या आहेत,पाणी मात्र अद्याप नाही नाही,तर हे जलजीवन योजना नावाला,पाणी टंचाई गावाला, ग्रामपंचायत तांबुळगाव येथील कर्म कहाणी,खर खोट बघायला हाय कोणी.अशी अवस्था तांबुळगाव ता.पालम येथील झालेली आहे.सध्या उन्हाळा जोर धरत आहे. अन् गावातील लोकांना मात्र पिण्यास पाणी मिळत नाही,दारासमोर असणारे पाण्याचे नळ,जलजीवन योजनेचे का गावातील ग्रामपंचायत ने दुसऱ्या योजनेतून केले,हा एक गुलदस्त्यातील प्रश्न प्रशासनाने सोडवावा,जलजीवन योजनेतून काम झाले तर,ग्रामपंचायत तांबुळगाव येथील पाणीपुरवठय़ाची नळयोजना कुठे गेली याची सखोल चौकशी करून निर्णय द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे मत पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हाध्यक्ष,श्री शेषराव सोपणे मामा यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केले

.jpeg)
.jpeg)
0 टिप्पण्या