दुधात फॅट वाढवण्यासाठी सर्रास विकली जाते पावडर अन्न व औषध प्रशासन विभाग धाराशिव यांच्याकडे तक्रार.

 दुधात फॅट वाढवण्यासाठी सर्रास विकली जाते पावडर

शिवसेना युवा नेते विकास बाबर यांची अन्न व औषध प्रशासन विभाग धाराशिव  यांच्याकडे तक्रार.



 धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :- भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो.तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केली जाते.यासाठी गावागावात दूध खरेदीसाठी दूध डेऱ्या उपलब्ध आहेत. दुधाचे फॅट ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे दुधाचा भाव दिला जातो.दुधाचे फॅट वाढावे यासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावडर आणली जात असल्याची तक्रार शिवसेना नेते विकास बाबर यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.या पावडरमुळे दुधाचे फॅट वाढत असले तरी ते आरोग्य साठी धोकादायक असून लहान मुले वृद्ध व्यक्ती आजारी होऊ शकतात.अश्या दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात त्यामूळे लहान मुले, वयोवृद्ध यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची भीती असून जीवाशी खेळण्याचे काम हे भूम शहरातील सात आठ पावडर विक्रेते करत आहेत.कोणतीही परवानगी नसताना सर्रास या ठिकाणी पावडर विक्रीचा व्यवसाय करताना  दिसत आहेत.याकडे मात्र अन्न व भेसळ अधिकारी कोणतीही चौकशी करताना दिसत नाहीत.सर्व पावडर विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी व भूम तालुक्यातून दूध भेसळ तात्काळ थांबवावी अशी मागणी शिवसेना नेते विकास बाबर यांनी अन्न सुरक्षा अधिकारी,अन्न व औषध प्रशासन विभाग धाराशिव यांच्याकडे केलेली आहे.या पावडर विक्रेतांवर कारवाई होणार का?याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या