या नावामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही का?हे नाव त्वरित काढावे अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार - एस.एम.युसूफ़
बीड प्रतिनिधी :- सध्या लोकसभा निवडणुकीसाठी लावण्यात आलेल्या आचारसंहितेची अंमलबजावणी सगळीकडे करण्यात येत आहे. राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्यांची नावे, फोटो, डिजिटल बॅनर वगैरे काढून टाकण्यात आलेली आहेत. असे असले तरी बीड शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मल्टीपर्पज मैदान मात्र या अंमलबजावणीतून सुटले आहे. येथे लावण्यात आलेल्या कमानीवर क्रीडांगणाच्या नावाखाली नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर असे नाव मोठ्या व ठळक अक्षरात लावलेले आहे. सगळीकडे आचारसंहितेची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात असताना त्यातून हे नाव सोडून देण्यात आल्याने या नावामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही का? असा प्रश्न उपस्थित करून संबंधित प्रशासकीय यंत्रणेने हे नाव येथून त्वरित काढावे अन्यथा याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आचारसंहिता असो की अन्य कुठलीही बाब त्याची अंमलबजावणी करताना सर्वांना समान नियम व कायदा लागू झाला पाहिजे. एकाला एक आणि दुसऱ्याला एक असे व्हायला नको. यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा असा अनुभव येतो. नियमांना हरताळ फासला जातो. असाच काहीसा प्रकार बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाच्या मल्टीपर्पज मैदानाच्या कमानीवर दिसून आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली म्हणून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे, पक्षाचे, नाव, फोटो असलेले छोटे मोठे सर्व प्रकारचे होर्डिंग्ज, झेंडे काढण्यात आले आहेत. असे असताना या मैदानाच्या कमानीवर मात्र बीड नगर परिषदेत जवळपास ३० ते ३५ वर्षांच्या काळात काही अपवाद वगळता नेहमी नगराध्यक्षपदी राहिलेले डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे मोठे व ठळक नाव मात्र आचारसंहितेची अंमलबजावणी न करता सोडून देण्यात आले आहे. असे का? येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही का? असे प्रश्न उपस्थित करून संबंधित प्रशासकीय यंत्रणेने हे नाव येथून त्वरित काढावे अन्यथा याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.


0 टिप्पण्या