आचारसंहिता लागू, नेमकं कोणकोणत्या कामावर बंदी,नियम डावलल्यास शिक्षा काय?*
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून,
एकूण सात टप्प्यात मतदान देशभरातील लोकसभा निवडणुका होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या पासूनच आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होई पर्यंत लागू राहते.
विशेष म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक उपक्रमांवर आणि कामांवर बंदी घातली जाते.
तसेच, आचारसंहिता भंग केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागते.
*नेमक्या कोणत्या गोष्टींवर आचारसंहिता काळात बंदी असते*,
*पाहू या*.
◆ सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही.
◆ कोणत्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी करता येणार नाही.
◆ सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतीचे आदेश काढता येत नाही.
◆ निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन, कर्मचारी यांचा वापर करण्यास मनाई असते.
◆ धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही.
◆ निवडणुकीच्या प्रचार करतांना सभा,
रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते.
◆ परवानगी शिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत
*प्रचारात मुलांचा वापर करण्यास मनाई*
५ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे.
ज्यात म्हटले आहे की, "राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचारा दरम्यान मुलांना आपल्या मांडीवर घेऊ नये,
त्यांना वाहनांमध्ये बसवू नये किंवा रॅलीत सहभागी करून घेऊ नयेत. निवडणूक आयोगाने मुलांना निवडणूक प्रक्रिये दरम्यान पोस्टर्स आणि पॅम्प्लेट वाटप करण्यास, घोषणाबाजी करण्याचे कामे देऊ नयेत
असेही सांगितले आहे.
*राजकीय पक्षाचे होर्डिंग काढावे लागतील*
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच राज्यात आचारसंहिता लागू होईल.
त्यामुळे राजकीय पक्षाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग तात्काळ काढून घ्यावे लागते. आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासनाची परवानगी घेतल्या शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला होर्डिंग लावता येत नाही.
अन्यथा आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होतो.
*रात्री १० नंतर सभा घेण्यास मनाई*
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, “सकाळी ६ च्या आधी आणि रात्री १० नंतर सार्वजनिक सभा घेता येणार नाहीत. याव्यतिरिक्त,
मतदान बंद होण्यासाठी निश्चित केलेल्या ४८ तासांच्या कालावधीत उमेदवार सार्वजनिक सभा आणि मिरवणुका घेऊ शकत नाहीत.”



0 टिप्पण्या