शेख अरहानचा वयाच्या सहाव्या वर्षी पहिला रोज़ा पूर्ण

 शेख अरहानचा वयाच्या सहाव्या वर्षी पहिला रोज़ा पूर्ण 



बीड प्रतिनिधी :- अरहान हुमेरा मोहसीन शेख याने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण केला.

शेख निसार अज़ीज़ोद्दीन जागीरदार यांचा नातू तथा शेख मोहसीन यांचा मुलगा शेख अरहान याने शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण केला. सध्या तप्त उन्हाळा आहे. रखरखत्या उन्हात मोठी माणसेही घायाळ होताहेत, तिथे सहा वर्षीय अरहानने रोज़ा पूर्ण केल्याने त्याचे कौतुक होत आहे. त्याने पहिला रोजा पूर्ण केल्याने त्याचे दादा-दादी, नाना-नानी, आई-वडील, चाचा-चाची, मामू-मुमानी, खाला-खालू, फुप्पू-फुप्पा व सर्व बहिण भावांनी मिळून अभिनंदन करत त्याने पुढील आयुष्यातही असेच रोज़े पूर्ण करावेत अशा सदिच्छा व्यक्त केल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या