पद्मपाणि प्रतिष्ठानकडून कर्तव्यदक्ष मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ सत्कार व सन्मान.
बीड प्रतिनिधी :- शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ हे गेल्या दहा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात करत असलेल्या निष्पक्ष, निर्भीड आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या सन्मानार्थ पद्मपाणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव तरकसे यांनी त्यांना शाल, हार, पुष्पगुच्छ व ड्रेस देऊन सत्कारित केले.
एस.एम.युसूफ़ हे पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक मुद्दे व प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने वाचा फोडून समाजहितासाठी चौफेर लेखणी चालवित आहे. त्यांच्या या कामगिरीच्या सन्मानार्थ पद्मपाणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव तरकसे सरांनी त्यांना शाल, हार, पुष्पगुच्छ आणि एक ड्रेस सप्रेम भेट देऊन सत्कारित केले. यावेळी सायं. दैनिक किसान चे संस्थापक संपादक शेख कामरान, उपसंपादक शेख फरहान, वृत्तपत्र क्षेत्रातील ज्येष्ठ संगणक तज्ञ नंदू गायकवाड, उपसंपादक सय्यद दाऊद, उपसंपादक राजू जोगदंड यांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या