पंढरपूर येथे श्री संत नामदेव कथासोहळ्याचे आयोजन

 पंढरपूर येथे श्री संत नामदेव कथासोहळ्याचे आयोजन



पंढरपूर प्रतिनिधी :- पंढरपूर येथे शिंपी समाज बांधवांच्या वतीने श्री संत नामदेव (हिंदी भाषेत )कथा सोहळ्याचे आयोजन लवकरच करण्यात आले आहे. 

यानिमित्त येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्यास अध्यक्षस्थानी संत नामदेव महाराज यांचे 16 वे वंशज मुकुंद महाराज नामदास हे होते.यावेळी कथा सोहळ्याचे आयोजक सुरत येथील नामदेव सेवा समिती अध्यक्ष जगदीश परिहार यांनी सांगितले की पंढरपूर येथे नामदेव महाराज भक्त कथा सोहळा २० सप्टेंबर 2024 ते 24 सप्टेंबर 2024 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ही कथा सांगण्यासाठी संत श्री 1008 रामप्रसादजी महाराज (बडा रामद्वारा) जोधपुर येथील महाराज येणार आहेत. हा कथा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी एक कमिटी तयार करण्यात येणार आहे. या कमिटीद्वारे भारतातील बेंगलोर चेन्नई बिकानेर पंजाब दिल्ली यासह संपूर्ण राज्यातील सर्व पोट जातीतील शिंपी बांधव उपस्थित राहणार आहेत.

यावेळी या बैठकीसाठी सुरतचे विकास रुणवाळ, चौतमल साकला,अशोक किंजडा,महावीर सर्वा,सिओ ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम मांढरे,पंढरपूर शिंपी समाज विश्वस्त राजेश धोकटे,अध्यक्ष गणेश उंडाळे,प्रशांत माळवदे,पुणे अध्यक्ष मंगेश मांढरे आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या