शहीद दिनानिमित्त 52 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 शहीद दिनानिमित्त 52 रक्तदात्यांनी केले रक्तदान



धाराशिव प्रतिनिधी :- AISF शाखा ईट तर्फे गेल्या 15 वर्षांपासून संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज व भगतसिंह, राजगुरू, सुखदेव ह्यांच्या शहीद दिनानिमित्त ईट शहरात विविध सामाजिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.


         दरवर्षीप्रमाणे  ह्यावर्षी जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिकारक शहिद भगतसिंह, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव ह्यांच्या शहिद दिनानिमित्त AISF शाखा ईट तर्फे भव्य असे रक्तदान शिबिर आयोजन केले होते. प्रथम शहिदांना अभिवादन करून AISF जिल्हा उपाध्यक्ष  कॉ. अशोक माने यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले. त्यांनंतर  आभार प्रदर्शन करून नंतर ब्लड कॅम्प ला सुरुवात केली. या शिबिरामध्ये 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पित केली.ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थिती पत्रकार बंधू सोमेश्वर स्वामी, समाधान डोके, फैसल भैया काझी, पंचायत समिती सभापती प्रताप भैया देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भैया देशमुख, उपसरपंच प्रज्ञा प्रमोद देशपांडे, सदस्य-सयाजी  हुंबे, ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण, युवा सेना निलेश चव्हाण ,काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे समीर भैय्या काजी,फकीरादल अध्यक्ष बाबासाहेब थोरात, स्वाभिमानी चे प्रसाद  सातपुते,संदिपान कोकाटे , अक्षय काळखैर,अशोक माने,शंकर राऊत,सागर भालेराव, समर्थ हुंबे,संग्राम लोखंडे,सागर हुंबे,नाना थोरात,तसेच व्यापारी बंधू,AISF जिल्हा उपाध्यक्ष- अशोक माने, कोषाध्यक्ष क्रांतिसिंह राऊत, शहराध्यक्ष- मयूर पवार  उपाध्यक्ष- प्रेम भागवत,अध्यक्ष- बाळासाहेब हुंबे, सुरज वेदपाठक, विकास खवळे, आयुब शेख तसेच गावातली कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या