जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव तालुक्यात प्रथम.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव तालुक्यात प्रथम.



मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचा निकाल जाहीर.



गुणवत्तेचा गुंजेगाव पॅटर्न याची परभणी जिल्ह्यात एकच चर्चा!




गंगाखेड प्रतिनिधी :- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शिक्षण विभाग पंचायत समिती गंगाखेड अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांच्या त्रिस्तरीय मूल्यांकनामध्ये जिल्हा परिषद शाळा मधून तीन शाळांची निवड करण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक गुंजेगावच्या जिल्हा परिषद शाळेने पटकाविला आहे.



भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन माननीय गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने करून तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या शाळा मधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव या शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड केली.




बालाघाट डोंगर रांगेत  व तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले गुंजेगाव हे गाव या गावची शाळा ही एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत आहे.


2020 साली जिल्हास्तरावर या शाळेला गंगाखेड तालुक्यातील आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मागील काही वर्षापासून या शाळेचा प्रत्येक बाबतीत  चढता आलेख आहे. मग ती शाळेची विद्यार्थ्यांची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता किंवा एन एम एम एस, स्कॉलरशिप, मंथन, नवोदय, आयुका यासारख्या स्पर्धा परीक्षा या सर्व बाबतीत या शाळेची प्रगती ही दिवसेंदिवस वाढतच आहे.


विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे बौद्धिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक असे सर्व प्रकारचे उपक्रम या शाळेत राबविले जातात.पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत आज रोजी 283 विद्यार्थी शिक्षण घेतात शाळेत एकूण नऊ शिक्षक कार्यरत आहेत.


माननीय माजी आयुक्त केंद्रेकर साहेब यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या श्रीहरीकोटा, थुंबा या अंतरिक्ष केंद्राला विमान प्रवासासह भेट या स्पर्धेतही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगावच्या दोन विद्यार्थिनींची निवड झाली होती. त्यातून त्यांना शासकीय खर्चाने श्रीहरीकोटा, बेंगलुरु, थूंबा या ठिकाणच्या अंतरिक्ष केंद्राला भेट देण्याची संधी याच शाळेने मिळवून दिली या बद्दल ही या पुर्वी शाळा जिल्हा भरात सकारात्मक चर्चेत आली होती.


गुंजेगाव येथील ही जिल्हा परिषदेची शाळा आजूबाजूच्या परिसरामध्ये नावलौकिक मिळवत आहे. ही शाळा घडविण्यामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री व्यंकटराव ढेले , सर्व आदर्श कार्यतत्पर सहकारी शिक्षण वृंद श्री सुलगुडले जी.सी, श्री मोरे डी. बी, श्री कदम डी. बी,श्री सगरे जी. टी, श्री गड्डीमे ए. डी, श्रीमती अजने एस व्ही, श्रीमती गुट्टे टी. डी, श्रीमती पाटील एस. जी यांचे मार्गदर्शन व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नवनाथ शिवाजी मोटे व सर्व समीती पदाधिकारी , ग्रामपंचायत च्या सरपंच पंचफुला सायस इमडे, ग्रामसेवक व उपसरपंच व सर्व सदस्य, शाळा सुधार समिती चे श्री सदाशिव लक्ष्मण इमडे, समीतीचे उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सर्व गावकरी, पालक या सर्वांचे या यशात अथक परिश्रम आहेत.


आज गंगाखेड तालुक्यामध्ये या शाळेची "शैक्षणिक गुणवत्तेचा गुंजेगाव पॅटर्न" अशी ओळख निर्माण झाली आहे. सभोवतालच्या काही गावांच्या विद्यार्थ्यांचा ओढा सध्या या जिल्हा परिषद शाळेकडे असल्याचा दिसून येत आहे.


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेतील एकूण 32निकषा पैकी 32निकषांची तयारी करून त्यांची आंमलबजावनी करणारी गंगाखेड तालुक्यातील एकमेव जिल्हा परिषद आदर्श शाळा म्हणून गुंजेगाव शाळा व गुणवत्ता संपन्न विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती,पालक गावकरी यांचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील जिल्हा स्तरीय स्पर्धेत ही गुंजेगाव शाळा बाजी मारणार अशा शुभकामना सर्व अधिकारी, पदाधिकारी,पालक देत आहेत


या यशाबद्दल शाळा व शिक्षक, गुणवंत विद्यार्थी यांचे वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या