येळी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न.
उमरगा तालुका प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील येळी येथे रविवार दि. ११फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व ज्ञानेश्वरी पारायणचे आयोजन येळी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले होते. ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी विष्णू सहस्त्रनाम ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरी किर्तन, हरी जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्यात विविध महाराजांची प्रवचने व कीर्तने आयोजित करण्यात आलेली होती, त्रिविध तापाने ग्रस्त झालेल्या संसारिक जीवनात मानवाला सुख प्राप्त व्हावे अशी तीव्र इच्छा असते. त्यासाठीच जीवनभर अहोरात्र धडपड चालू असते. परंतु, प्रवासात आयुष्यभर दुःखच भोगावे लागते. कारण नेमका मनुष्य सुखाचा मार्ग चुकतो, तो मार्ग अखंड सुख प्राप्तीचे साधन संत महात्यांनी सांगितला "मार्ग दावुनी गेले आधी । दयानिधी संत ते गुरूवर्य मारूती महाराज कानेगावकर, गुरवर्य उज्वलानंद महाराज अचलबेट व गुरूवर्य धोंडोपंत दादा महाराज पंढरपूर, यांच्या कृपा आशिर्वादाने प्रतिवर्षा प्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन व शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या अमृत वाणीचा सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. शनिवारी दि. १७ रोजी शेवटच्या दिवशीचे काल्याचे किर्तन ह.भ.प. महेश महाराज माकणीकर यांनी केले. हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी भगिरथ पवार, व्यंकट रेड्डी, ज्ञानेश्वर पवार,केशव संगुळगे, रमेश माळी, अमित रेड्डी व मोतीलाल चव्हाण यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या