दयावान सरकार व समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने गरजू रुग्णास रक्त उपलब्ध करून देऊन मदत
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्र भर आपल्या निःस्वार्थ कार्यानी प्रचलित असलेल्या सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणी तसेच समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संघटना समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिपभाई निकुंभ, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजयभाई गायकवाड, डोंबिवली कार्याध्यक्ष ऍड. सुभाषभाई अंभोरे, परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीरसिंग भाई टाक यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय महिला प्रसूती गृह येथे बाळंतपणासाठी उपचार घेत असलेल्या गरजू महिलेला A- (निगेटिव्ह) रक्तगटाच्या रक्ताची परभणी शहरातील संजीवनी प्रतिष्ठान संचलित श्री हजूर साहेब ब्लड बँक वसमत रोड येथून दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी मध्य रात्री 1 वाजेच्या सुमारास दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हाकार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख शेख अझहर, भिमाकोरेगाव मित्रमंडळ अध्यक्ष संदीप वायवळ यांनी रक्त उपलब्ध करून देऊन मदत केली आहे. रक्त उपलब्ध करून देण्यासाठी बालाजी दामूके, ब्लड बँक टेक्निशन दीपक भाऊमुंडे, प्रदीप नागरे, जनसेवक रमेश घनघाव आदींचे विशेष सहकार्य लाभले. वेळेवर रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल रुग्णाचे नातेवाईक संदीप खराटे यांनी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य व समाजहित अभियान प्रतिष्ठान तसेच हजूर साहेब ब्लड बँक चे आभार मानले आहे.
शहरातील हजूर साहेब ब्लड बँक ही गरजू रुग्णांसाठी देवदूत तसेच संजीवनी ठरत आहे. रुग्णांना कमी वेळेत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी 24 तास कार्य करत रुग्णांची सेवा करत असल्यामुळे दयावान सरकार महाराष्ट्र राज्य व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने ब्लड बँक टेक्निशन दीपकभाऊ मुंडे व प्रदीप नागरे यांचे कार्याचे कौतुक करून आभार मानले आहे.

0 टिप्पण्या