आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली
पाणीपुरवठा आढावा व नियोजन बैठक संपन्न
गंगाखेड प्रतिनिधी :- गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज पालम तालुका प्रशासनाची पाणीपुरवठा आढावा बैठक तहसील कार्यालय येथे संपन्न झाली.
संभाव्य धोका लक्षात घेवून पाणी पुरवठा विषयी आढावा घेवून योग्य ते धोरण निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रशासनाने उपलब्ध पाणी साठा, होत असलेले नियोजन आणि भविष्यातील उपाय असा विस्तृत आराखडा सादर केला.
बैठकीचे औचित्य साधून अनेक ग्रामस्थांनी गावनिहाय अडचणी मांडल्या. त्यावर प्रशासनाने त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गावनिहाय सर्वे करून डाटा संकलन करा व त्यानुसार धोरण ठरवा असेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील ग्रामस्थांना आणि पशु व इतर घटकांना पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी काटेकोरपणे नियोजन करा. आवश्यक ती कामे पूर्ण करा. आर्थिक बाबींसाठी पत्रव्यवहार करा. त्यास मी त्वरीत मंजुरी मिळवून आणतो. पण, पाणी पुरवठा विषयी कोणतीही हयगय करू नका, असाही सल्ला आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, गटविकास अधिकारी उदयसिंग शिसोदे, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, रासप तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, युवक अध्यक्ष भगवान शिरसकर,
नगरसेवक उबेदखान पठाण, असदुल्ला पठाण, मोबिन कुरेशी, रहिमतुल्ला पठाण, माजी सभापती गणेशराव घोरपडे, विजय घोरपडे, राहूल शिंदे, युसुफ सय्यद, शिवराम पैके, बाळासाहेब कुरे, चंद्रकांत गायकवाड, सरपंच माधवराव गिनगिने यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी, विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या