गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते आज पालम येथे साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
पालम तालूका प्रतिनिधी :- अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा उत्सव म्हणजे दीपावली. त्या निमित्त ऊर्जा, मांगल्य आणि तेज द्विगुणित करण्यासाठी प्रथम पहिली शिक्षषका क्रांतीज्रयोती सावित्रीबाई फुले व राजमाता पुण्ययश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून,
पालम तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी ताई, मदतनीस, महिला सफाई कामगार, पंचायत समिती बचतगट,
सिआरपी महिला भगिनींना कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते साडी व प्रत्येकी तीन किलो साखरेचे वाटप करण्यात आले.
यावेळी रासप प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, गटविकास अधिकारी उदयसिंग शिसोदे,
रासपा जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप आळनुरे, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, रासप तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, नगरसेवक उबेदखान पठाण,असदुल्ला पठाण,मोबिन कुरेशी यांच्यासह सर्व आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका, मदतनिस, महिला सफाई कामगार, सि.आर.पी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या