आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेबांच्या मागणीस अखेर आले यश.

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेबांच्या मागणीस अखेर आले यश...

गंगाखेड प्ररतिनिधी :- गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेवून परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. 
 
परभणी जिल्ह्यात सध्या भयानक परिस्थिती आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजाच्या मनात निराशेचे ढग दाटले आहेत. त्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर असा प्रकार घडल्यास शेतकरी अधिक हतबल होतील, याचा सकारात्मक विचार करून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा यादीत नव्याने समावेश करावा. तसेच नियमानुसार शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, असेही त्या मागणी पत्रात नमूद केले होते.

अखेर कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या त्या पत्राची राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक दखल घेतली आहे. त्यामुळे केवळ गंगाखेड विधानसभाच नव्हे तर परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा नव्याने प्रसिद्ध झालेल्या दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला आहे, हि आनंदाची गोष्ट आहे. परिणामी, नागरिक व शेतकरी यांच्यासह विविध घटकांना दिलासा मिळाला आहे. 

दुष्काळ सदृश्य तालुक्यांच्या यादीत समावेश झाल्यामुळे जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,
टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा बाबींमध्ये सवलत मिळणार आहे. 

परिस्थिती पाहून केलेल्या मागणीला सकारात्मक विचार करून अवघ्या काही दिवसात हिरवा कंदील दाखवून राज्य शासनाने हे सरकार गतिमान असल्याचे सिध्द केले आहे. त्यामुळे शासनाचे कौतुक करावे लागेल, असे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या