नांदेड जिल्ह्हयातील प्रा.भारती कांबळे यांना पीएच.डी प्रदान..
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- नांदेड जिल्ह्यातील तरोटा व अश्वगंधा वनस्पतीतील रोगप्रतिकारक औषधी गुणधर्मांचा चिकित्सक अभ्यास "या विषयात पीएच.डी प्रदान
मोजमाबाद, ता. पालम येथील जयभवानी कनिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका भारती किशनराव कांबळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्यावतीने "महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील तरोटा व अश्वगंधा वनस्पतीतील रोगप्रतिकारक औषधी गुणधर्मांचा चिकित्सक अभ्यास "या विषयात नुकतीच पीएच.डी प्रदान केली. त्यांनी आपला शोधप्रबंध लोहा येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख
प्रोफेसर डॉ संजय मंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध
विद्यापीठाला सादर केला होता..
त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष मा.कांतराव चव्हाण साहेब,सचिव दत्तराव राठोड, कोषाध्यक्ष संध्याताई राठोड,प्राचार्य बालासाहेब राठोड, डॉ. भिमराव कांबळे प्रो.डॉ. संतोष हंकारे, श्री किशनराव सोनकांबळे, डॉ.दिपाली पांडे मॅडम, प्रा. दैवशाला राठोड मॅडम, प्रा. शिवकांता कोंपलवाड, डॉ. शंकर घाडगे, डॉ.सारिका केदार, प्रा.संदिप दराडे, प्रा.संभाजी बरले, प्रा. भालचंद्र मोघेकर, प्रा.कैलास जवळगे, प्रा.सुजीत जाधव, देविदास वावळे सर ,अर्चना मिरकले मॅडम,प्रा. गजानन बेद्रे , सखाराम राठोड व सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नातेवाईक यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

0 टिप्पण्या