परभणी जिल्हा प्रतिनिधी :- परभणी येथील आजाद क्रीडा मंडळाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023 चा आरोग्य क्षेत्रात आयुर्वेदाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांना दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी वेळ सायंकाळी 7 वाजता स्थळ:- हॉटेल विसावा कॅफे कन्या प्रशाला समोर स्टेशन रोड परभणी येथे मान्यवराच्या हस्ते देण्यात आला. महाराष्ट्रतील प्रसिद्ध असलेले आयुर्वेदिक विद्या विशारद सामाजिक कार्यकर्ते डॉ.गोविंद कामटे सेलूकर (राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सल्लागार) यांना आरोग्य क्षेत्रात आयुर्वेदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची गंभीर आजारापासून माफक दरात सेवा व कोरोना काळात हजारो रुग्णांचे जीव वाचवल्याबद्दल,आझाद क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोईन खान यांनी दिला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व माजी खासदार अँड.गणेशराव दुधगावकर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री विजयराव वरपूडकर,माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले,मा.नगरसेवक विशाल बुधवंत,समीर दुधगावकर, मा.नगरसेवक मिठूभाई,काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती मलिका गफार,जलील पटेल,शेख नासिर,आयोजक आझाद क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोईन खान,काजी फहिम व पुरस्कार निवड समितीचे रमाकांतअण्णा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार दिल्याबद्दल डॉ.कामटे यांचे राष्ट्रजण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक गोसेवक नितीन महाराज गोगलगावकर व मित्र परिवारांनी पुढील कार्यास अभिनंदन व स्वागत केले आहे.

0 टिप्पण्या