अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड.पोलीस आणि समाजासाठी सर्व पदाधिकारी बांधील आहेत - एस.एम.युसूफ़

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड.पोलीस आणि समाजासाठी सर्व पदाधिकारी बांधील आहेत - एस.एम.युसूफ़ 

बीड जिल्हा प्रतिनिधी :- शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले की, पोलीस आणि समाजासाठी सर्व पदाधिकारी बांधील आहेत.
               
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदुरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे आणि राज्य प्रसिद्धी प्रमुख सोपने मामा यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेच्या बीड जिल्हा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आलेल्या बैठकिमध्य नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा एस.एम.न्युज़चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सचिव अशोक भिसे यांनी केले. सूत्रसंचालन ऑड.शेख अब्दुल सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शेख एजाज़ यांनी केले. यावेळी गोकुलसिंग बायस जिल्हा उपसचिव, सुनील कटारे जिल्हा कोषाध्यक्ष,महावीर पंडित केज तालुकाध्यक्ष, कृष्णा ओव्हाळ केज तालुका उपाध्यक्ष, मेघराज साळुंके शिरूर तालुकाध्यक्ष,दत्ता कटारे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष, आकाश शिंगाडे अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष,अमोल ठोंबरे गेवराई तालुकाध्यक्ष आणि ऑड.शेख अब्दुल सरदार माजलगाव तालुका सचिव पदी नियुक्त करण्यात आले.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना एस.एम.युसूफ़,डॉ.शेख एजाज़ आणि अशोक भिसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सोपणे मामा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांनी म्हटले की,संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य पोलीस आणि समाजासाठी झोकून देऊन काम करतील.पोलिसांसह समाजातील प्रश्नांसाठीही पाठपुरावा करतील.संघटनेकडून जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न संघटनेचे पदाधिकारी निश्चितपणे करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या