रस्ता देता का रस्ता तांबुळगाव मुदखेड सिपेगाव येथील नागरिकांची आक्रोश आरोळी

रस्ता देता का रस्ता तांबुळगाव मुदखेड सिपेगाव येथील नागरिकांची आक्रोश आरोळी

अनेक वर्षापासून दुर्लक्षीत रस्ता दुरूस्तीसाठी पुन्हा उपोषणाची वेळ

खासदार साहेबानी दिलेल्या आश्वासनाचा आवमेळ,मुदखेड सिपेगाव तांबुळगाव येथील लोकांला विश्वाला तडा,भरोसा ठेवावा तरी कोणावर?

पालम तालूक्यातील पेठपिंपळगाव ते तांबुळगाव,सिपेगाव, मुदखेड जाणारा रस्ता अनेक वर्षापासून नादुरूस्त असल्याने सदर गावकऱ्याना तालूक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी व वेळ प्रसंगी दवाखाना,किंवा महत्वाच्या कामासाठी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आसल्याने,मुदखेड ग्रामपंचायत कार्यालयासमोर वर्षापुर्वी तांबुळगाव,मुदखेड,सिपेगाव येथील नागरिकांनी धरणे आंदोलन केले असता; आमदार,खासदार,तसेच राजकिय पुढारी आले व मोठ मोठ्या गप्पा मारून गेले.याच वेळी खासदा संजय उर्फ बंडू जाधव यांनी रस्ता तात्काळ दुरूस्त करण्याचे आश्वासन देऊन उपोषण उठवले होते.
परंतू वर्षे झाले तरी आजूनही काम चालू केले नाही व कसली डागडूजी देखील केली नाही,बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी खासदार साहेब म्हणले मारा फुरका.त्यामुळे तांबुळगाव,सिपेगाव,मुदखेड येथील नागरिकांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.यावेळी काम करा नाहीतर पुढाऱ्याला गावबंदी,निवडनूकिवर बहिष्कार,व खोटे आश्वासने देऊन नागरिकांची चेष्टा करणाराची वहिवाट असा उपोषण कर्त्याचा ठाम विचार झाला असून,कांही तरूणांनी चक्क केस कापून बेजबादार नेतृत्वाचा बहिष्कार केला.सांगू नका कम सुरू करा असा ईशारा देऊन उपोषणाला सुरूवात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या