जालन्यातील घटनेबद्दल पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी शिंदे सरकारने शब्द पाळला नसल्याने आंदोलन झाल्याचे उद्गार काढले.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- आंदोलन कर्त्यांवर बळाचा वापर करुन चिरडण्याचा व पोलिसांकरवी हवेत गोळीबार करुन आंदोलकांना हुसकावून लावण्याच प्रयत्न हे एक शडयंत्र.कारण मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त करून.चर्चा सुरु असतानांच लाठीहल्ला केला याचा अर्थ काय.
आंदोलकांनी शांततेत आंदोलन सुरु ठेवावं कारण हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी घटना घडलेल्या अंतरवली सरावटी या गावी जाऊन आंदोलकांची भेट घेतली.व शरद पवार साहेब यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
मराठा आंदोलकांसंदर्भा घडलेला प्रकार हा गंभीर असून जखमींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना मुंबईवरून फोन आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याची आंदोलकांनी मला सांगितले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी स्पष्ट केले आहे
शरद पवार साहेब पुढे बोलताना म्हणाले की, घडलेले प्रकार हा गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापूरता मर्यादीत राहणार नाही. म्हणून मी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घटनास्थळी येण्याचा निर्णय घेतला. संकटात असलेल्यांना दिलासा देण्याची गरज असते. खरं सांगायचं म्हणजे मराठवाड्यात मोठा दौरा आयोजित करण्याच्या प्रयत्नात होतो. दुष्काळाची स्थिती पाहायची होती. जलाशयामधील पाणीसाठा अपुरा आहे. पुढील संकटे येणार आहे म्हणून दौरा आयोजित करणार होतो. मात्र ही घटना अचानक घडली. आज आम्ही तिघांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. आश्चर्य वाटेल अशा प्रकारचा बळाचा वापर करण्यात आला आहे. लहान मुले, वडीलधाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. जखमी आंदोलनकर्त्यांनी माहिती दिली की आमची चर्चा सुरू होती अधिकारी बोलत होते मार्ग निघेल असे दिसत होते. मात्र जास्तीचे पोलीस तिथे बोलावण्यात आले. सर्व व्यवस्थित सुरू असताना मुंबईवरून सूचना आल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दृष्टीकोण बदलला म्हणून त्यांनी बळाचा वापर सुरू केला. हवेमध्ये गोळीबार केला. लहान छऱ्यांचा वापर करण्यात आल्याचीही माहिती जखमींनी दिली असे शरद पवार साहेब यांनी सांगितले आहे

0 टिप्पण्या