औरंगाबाद येथे विराट मोर्चा,बंजारा समाजासह सर्व सामान्याचे अनेक प्रश्न घेऊन येनार पांढर वादळ :- दशरथ राठोड मराठवाडा अध्यक्ष बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश

औरंगाबाद येथे विराट मोर्चा,बंजारा समाजासह सर्व सामान्याचे अनेक प्रश्न घेऊन येनार पांढर वादळ :- 
दशरथ राठोड मराठवाडा अध्यक्ष बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश 

परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- तमाम बंजारा व विमुक्त जातीच्या विमुक्त प्रवर्गावर , 1991 च्या एका मोठ्या  जातीय आरक्षण  अतिक्रमाणा  नंतर   सरकारने हेतुपुरस्कर पणे चालविलेल्या सर्वात मोठ्या जातीय  घुसखोरीमुळे,आपल्या  पुढील पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे!
खोटया जात प्रमाणपत्र धारकविरुध्द SIT  या तपासणी समितीची नेमणूक करण्याचे सरकारने अश्वासन देउन लगेच  नकार देऊन,अर्थ जातीय घुसखोरांना सरकार अभय देत आहे! त्यामुळे ही घुसखोरी थांबणारी नसल्याने पांढर वादळाच्यारूपाने मैदानात उतरून,आंदोलन करण्यची वेळ सरकारने आणून,सरकारणे भटक्याविमुक्ताला आव्हान दिले आहे.सरकारच्या या निच प्रवृत्तीला मुहतोड, जबाब देणे कर्तव्यच नाही,तर ती आपली जबाबदारी  आहे!
म्हणूनच  आपण हे त्यांचे  आव्हान  स्वीकारले आहे!असे मत दशरथ राठोड मराठवाडा अध्यक्ष बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश यानी व्यक्त केले आहे.चलो देखते है   किसमे कितना है दम?मित्रानो निधड्या छातीने डटुन उभे रहा 
मैदान सोडू नका, भयभीत होऊ नका  असे करून  चालणार नाही!आता लढलो नाही तर आपले सामाजिक मरण अटळ राहील!म्हणून जिंकू किंवा मरू या जिद्दीने व इर्षेने मैदानात उतरा!लक्ष्यात ठेवा,तुम्ही रणवीर  महान योद्धा विर लकीशा,अल्ला,उदलचे  वंशज आहात पळपुटे बाजीरावाचे नाहीत!म्हणून  उठा पेठून उठा,हातात झेंडे घ्या,डोक्यात संविधान ठेवा,23 च्या औरंगाबाद च्या क्रांती मैदानावर,क्रांती व्हायलाच पाहिजे हे बंजारा  क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने,आवहान आहे! कुठल्याही परीस्थितीत या मैदानेजंग मध्ये आपल्याला जीत हासील करावयाची आहे!जाती जातीत भांडणे लावणाऱ्या या जातीयवादी सरकारला उखडून फेकावे लागेल व अद्दल घडवावी लागेल!त्यांचा येथे मणिपूर घडविण्याचा  डाव हाणून पाडावयाचा आहे,मणिपूरला असेच घडले,एका सशक्त समाजाला,कमजोर समाजाच्या आरक्षणात घुसविले गेले,त्यामुळे साहजिकच मूळ हकदार समाजाने या घुसखोरीला  विरोध केला, त्या मूळे त्यांच्या आपसात संघर्ष पेटला गेला,परिणामी तेथे आज कमजोर समाजाला वेचून वेचून मारलं जात आहे!तसाच काहीसा प्रकार येथे झाला तर?आपल्या दुबळ्या समाजाचे काय होणार?म्हणून या सत्ताधीशाना लोकशाही मार्गाने दणका  द्यावयाचा आहे,
म्हणून कळकळीची विनंती आहे,बघ्याची भूमिका घेऊ नका षंढ बनून राहू नका! आंदोलनात भाग घेऊन,आपल्या अस्तित्वाच्या लढाईचे भागीदार व साक्षीदारही व्हा!जर ही लढाई जिंकलो नाही तर पुढची पिढी आपल्याला  माफ करणार नाही!या अतिक्रमणाचा  मुकाबला करावाच
लागेल,मैदानात उभे रहावेच लागेल! तर बघता काय? सामील व्हा ! असे बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे जळजळीत आव्हान आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या