अहमदपूर व वाढवणा पोलिसांनी एकाच दिवशी जायमोख्यावर जाऊन पाच मटका एजंटावर केली कार्यवाही.
उदगीर प्ररतिनिधी देमगुंडे जयराम :- गुडसुर उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या स्थानिक वाढवणा गावातील मटका नावाचा जुगार खेळला व खेळवीला जात असल्याची गुप्त माहिती नुतन डी वाय एस पी कल्याणकर व नुतन साहायक पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांना दोस्ताना ज्युस सेंटर हॉटेल मध्ये मटका नावाचा जुगार चालु असल्याची माहिती मिळताच
अहमदपूर डी वाय एस पी पथक व वाढवणा पोलिसांनी दोस्ताना ज्यूस सेंटर व हॉटेल मध्ये वाढवणा पोलिसांनी धाड टाकून रंगेहात आरोपी यासर अराफात मगदूम शेख रा. कंधार व फेरोज रहुफ उंदरे रा.वाढवणा बु दोस्ताना हॉटेल मध्ये स्वतःच्या फायदासाठी मटका खेळताना व खेळविताना रंगेहात जुगार साहित्य व 13140 तेरा हजार एक शे चाळीस रुपये नगदी रोख जवळ मिळाल्या वरून
या आरोपी मटका एजंट यासर अराफात मगदूम शेख कंधार व फेरोज रहुफ उंदरे वाढवणा बु.या दोघां आरोपीवर वाढवणा ठाण्यात केंद्रे जमदार यांनी फिर्याद दिल्यावरून गु. र. नं 188/23 कलम 12(अ )मुबंई जुगार कायदा प्रमाणे साहायक पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस कलकत्ते कडे देण्यात आला तसेच डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शना खाली मटका बुक्की वर धाड घालण्यात आली यावेळी मटका एजंट फेरोज रहुफ उंदरे,वाढवणा बु,मटका किंग जावेद पठाण रा.हाळी,खेळणारा किशोर भानुदास बंडे रा. बेळसांगवी या तिघे जन मटका खेळताना व खेळविताना मटका साहित्य व नगदी रोख 28080 अठ्ठावीस हजार 80 रुपये मिळून आल्यावरून दि.11 ऑगस्ट शुक्रवार रोजी 3 वाजून 50 मिनिटास गु. र. नं 189 /23 कलम 12 अ मुबंई जुगार कायदा प्रमाणे फिर्यादी रुपेश कज्जेवाड जमादार यांनी वाढवणा ठाण्यात फिर्याद दिल्यावरून फेरोज रहुफ उंदरे, जावेद पठाण रा. हाळी, किशोर बंडे रा. बेळसांगवी या तिन्ही आरोपीतावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस कलकत्ते करीत आहेत वाढवणा व अहमदपूर पोलिसांनी स्वतः जायमोख्यावर जाऊन कार्यवाही केल्यामुळे डी वाय एस पी कल्याणकर व साहायक पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांचा दरारा अवैध मटका घेणाऱ्या एजंटावर पडला आहे मागील वाढवणा ठाण्याचे साहायक निरीक्षक यांच्या काळात फक्त ठाण्यात बसुन केस मागून घेऊन गुन्हा दाखल केला जात होता मात्र आता दोन्ही अधिकारी नवीन असुन जायमोख्यावर जाऊन रंगेहात पकडून ठाण्यात नेहून गुन्हा दाखल करत असल्यामुळे अवैध मटका घेणाऱ्या एजंटाचे धाबे दनांनलेले दिसत असुन गावात दोन वर्षां पासुन बुक्कीच्या ठिकाणी स्वतः जायमोख्यावर जाऊन पोलिसांनी कार्यवाही केल्याचे पाहुन असंख्य ग्रामस्थाना कुतूहल वाटतं असल्यामुळे ठाण्यासमोर असंख्य ग्रामस्थ बघत असताना दिसत होते

0 टिप्पण्या