शिवप्रसाद वाव्हळे महसूल सहाय्यक व महिपती कांबळे कोतवाल यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान
पालम तहसील कार्यालयास प्रथमच शिवप्रसाद वाव्हळे व महिपती कांबळे यांच्या रुपाने मिळाला बहुमान
पालम प्ररतिनिधी विनोद कांबळे :- तहसील कार्यालय पालम येथे कार्यरत शिवप्रसाद वाव्हळे महसूल सहाय्यक व महिपती कांबळे कोतवाल यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल मंगळवारी दिनांक 1/ 8/ 2023 सेलू येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महसूल दिनानिमित्त महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवारी सेलू येथील साई नाट्यगृहात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सन 2022-2023 या वर्षात महसूल उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पालम तहसील कार्यालयात शिवप्रसाद वाव्हळे महसूल सहाय्यक व महिपती कांबळे कोतवाल यांना जिल्हाधिकारी गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, नायब तहसीलदार राजेश पवळे, महसूल कर्मचारी संघटना तसेच तलाठी कर्मचारी संघटना आदींनी अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या