प्रशासनाच्या विरूद्ध शुक्रवारी पालम बंद
पालम प्ररतिनिधी :- मागील आठवड्यापासून पालम तहसील कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरू असतानाही आवश्यक कार्यवाही केली नाही. त्यामुळे 21 जुलै रोजी
पालम बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांना घेतला आहे. त्यांनी बंदचे निवेदन तहसिलदारांना दिले असून शकडो युवक यावेळी उपस्थित होते.
पालम नगरपंचायतीच्या विकास कामात अनागोंदी सुरू आहेत. या नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याच्या मागणी अॅड. राम मणियार यांनी केली आहे. त्यासाठी ते 15 जुलैपासून पालम तहसिलसमोर उपोषणास बसले आहेत. तरीही प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. परिणामी, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे. वेळखाऊपणाचे धोरण प्रशासनाचे सुरू आहे. त्याविरूद्ध पालम शहरातील नागरिक एकवटले आहेत. त्यांनी तहसिलदारांची स्वतः भेट घेवून निवेदन दिले आहे. निवेदनावर पांडूरंग मंचकराव रोकडे, सतिष सिरस्कर, प्रभाकर गोडसे, रामराव माणिकराव रोडके, कुशांबर पुरी, रमेशराव रोकडे, तुळशीराम पौळ, गोपाळ चौधऱी, सुरेशराव कोकाटे, प्रमोद इनामदार, मयूर शर्मा, माधवराव कानगुले, विनोद चमकूरे, राजकुमार वैद्य, नवनाथ पांचाळ, विशाल रोकडे, अविनाश जोशी, तुकाराम सिरस्कर, संतोष कन्नावार, शेख, महेश नारलावार यांच्यासह आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
फोटोओळी ः पालम तहसिलदारांना मागणीचे निवेदन सादर करताना युवक.

0 टिप्पण्या