राजकारणात पुन्हा एक खळबळाट,आता राष्ट्रवादी,शिंदेगट शिवसेना,भाजप एकसाथ.राजकारणाच राज काय?•••••

राजकारणात पुन्हा एक खळबळाट,आता राष्ट्रवादी,शिंदेगट शिवसेना,भाजप एकसाथ.राजकारणाच राज काय?•••••

मुंबई प्रतिनिधी :- महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत.अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवणाऱ्या अजित पवार यांनी आज (रविवार) त्यांच्या निवासस्थानी समर्थक आमदारांची बैठक घेतली आणि त्यानंतर 18 आमदारांसह ते राजभवनाकडे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी न मिळाल्याने अजित नाराज असल्याचे बोलले जात आहे.

दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,छगन भुजबळ,किरण लहमटे,निलेश लंके,धनंजय मुंडे,रामराजे निंबाळकर,दौलत दरोडा,मकरंद पाटील,अनुल बेनके,सुनील टिंगरे,अमोल मिटकरी,आदिती तटकरे,शेखर निकम,निलय नाईक, अशोक पवार,अनिल पाटील,हे आमदार सोबत घेऊन

अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटासोबत जाऊ नये म्हणून सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. पण अजित पवार यांनी कुणाचं ऐकलं नाही. बैठकीनंतर ते तडक आमदारांना घेऊन ते राजभवनावर गेले आहेत.

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत. अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या