श्री विठ्ठल रुक्मिणी दिंडी सोहळा नशिकवरून भिमाशंकर दर्शन घेण्यासाठी निघाला.
लोहा तालुका प्रतिनिधी योगेश दरबस्तवार :- नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे आष्टूर तथा आष्टश्वर येथील हभप श्री योगेश महाराज यांनी परिसरातील भाविक भक्तांना सोबत घेऊन, श्री विठ्ठल रुक्मिणी पाई दिंडी सोहळा चालू केला, महाराष्ट्र म्हणजे संताची भुमी या भूमित जन्म घेणे म्हणजे,पुर्व सुक्रुताचे फळ म्हणावे लागेल, आणि आळंदी ते पंढरपूर पाई सोहळ्यासाठी जाण्याची संधी मिळाली म्हणजे, मोक्षप्राप्ती समजावी
अशाच विचारातून हभप श्री योगेश महाराज आष्टूरकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी दिंडी सोहळा चालू केला, या साठी हभप श्री प्रभाकर महाराज बाबर, यांनी सकारात्मक भूमिका घेतली व विणेकरी हभप श्री बुधाजी बंडे,झेंडेकरी हभप श्री रावसाहेब मोहटे व हभप श्री किशन गुद्दे, हभप श्री संभाजी शिंदे, हभप श्री गुलाबराव बाबर तर तुळशी वृंदावन घेण्यासाठी हभप श्रीमती पिंगलाबाई पुरी हभप सरुबाई दरबस्तवार, हभप महानंदाबाई पवार,आचारी श्री किशनराव दरबस्तवार, श्री प्रद्युम्न रेनगुटवार,व श्री भास्कर वाघमारे सर, यांनी पुढाकार घेतला व चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू या संतांच्या उक्तीप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी दिंडी सोहळा चालू केला.
श्री विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी सोहळा नाशिक येथील पंचवटी येथे श्री काळाराम मारुतीचे दर्शन घेऊन भिमाशंकरकडे रवाना झाली
दिंडीमध्ये असनारे वारकरी खतगाव. पावडेवाडी,आर्धापुर,वरखेड,आष्टुर तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.असे माध्यमांशी बोलताना हभप श्री योगेश महाराज आष्टूरकर यांनी सांगितले.

0 टिप्पण्या