अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सोलापूर शहराध्यक्षपदी सरफराज शेख यांची निवड.

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सोलापूर शहराध्यक्षपदी सरफराज शेख यांची निवड.

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :- अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष यशवंत पवार हे होते या बैठकीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध विषयांवर चर्चा होऊन अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना सोलापूर शहर अध्यक्षपदी सरफराज शेख यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना चे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदूरकर महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सोपने मामा यांच्या आदेशानुसार 
एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते नूतन शहर अध्यक्ष सरफराज शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मल्लिनाथ कोळी, विष्णू सकट, सिद्राम येलदी,हारूण फुलमामडी, राजाभाऊ पवार, सुरेश भिंगारे,ओंकार मोरे, अतुल भडंगे,सिध्दार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या