पालम प्रतिनिधी :- पालम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे डॉ. कालिदास निरस यांच्या उपस्थितीत ड्रा. व्ही एम रोकडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चाटोरी व श्रीमती शोभा तम्मलवाड आरोग्य सेविका उपकेंद्र केरवाडी यांचा डॉ. श्रुती रोकडे वैद्यकीय अधिकारी बनवस निरोप समारंभ शाल श्रीफळ पुष्पहार घालून व एक भेटवस्तू देऊन सर्वांच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर रोकडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र चाटोरी येथून ग्रामीण रुग्णालय पालम येथे तर शोभा तमलवाड यांची पालम तालुक्यातील उपकेंद्र केरवाडी येथून पूर्णा तालुका देऊळगाव दुधाटे उपकेंद्र येथे बदली झाली असून यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक संतोष राव मुंडे व कनिष्ठ सहाय्यक सुदर्शन कराड कार्यक्रम सहाय्यक अमोल देशपांडे सह नागेश कदम महेंद्र गवळी पांडुरंग राठोड आरोग्य सहाय्यक शंकर चाटे अमृता बंडेवाड आरोग्य सहायिका जे एन वाघमोडे आरोग्य सेवक माटे नागेश कडमपल्ले सह समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.आरती कोरडे डॉ.तेजस्विनी वाबळे डॉ. शुभांगी कारामुंगे डॉ. संतोषी माता रोहिणीकर डॉ. मुक्ता चव्हाण डॉ. ओम प्रकाश जाधव,पवन राठी, डॉ. शुभम कराड, डॉ. विष्णू पिसाळ, डॉ. पांचाळ, डॉ. मनोहर शेख,डॉ. मशीन शेख सह आरोग्य सेविका बेबी राठोड, राणी डोने,सविता राठोड, नंदा तागडे, दिपाली सानप,राधिका देवकांबळे, एल जी मुसळे ,जयश्री हातागळे कांगणे, मजरे, आवके, वजीर,जळके निलेवाड सहकार्यक्रम यशस्वीतेसाठी जी डी पोळ यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल देशपांडे यांनी केले

0 टिप्पण्या