आदित्य रायाजी सुरनर यांची महाराष्ट्र पोलीस दलात अमरावती येथे नियुक्ती झाल्याने सत्कार,

आदित्य रायाजी सुरनर यांची महाराष्ट्र पोलीस दलात अमरावती येथे नियुक्ती झाल्याने सत्कार,

गंगाखेड तालुका प्रतिनिधी :- आदित्य हे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले, वेळी अवेळी शेती मध्ये वडलांना कामात सहकार्य करत, शिक्षण घेऊन, जिद्द व चिकाटी मनात ठेवून, प्रयत्नांची कसोटी करून अखेर रायाजी सुरनर यांच मनोरथ आदित्य यांनी पूर्ण केले, पुत्र जन्मावा ऐसा गुंडा,त्रिलोकी लावावा झेंडा,ही उक्ती यावेळी लागु पडते,
आदित्य यांच्या कुटुंबात आई,वडील दोन बहिणी असून आदित्य हे एकूलते एक सुपुत्र आहेत,वडील व आई शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, त्याच बरोबर रायाजीचे सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान असते.
जीवनात येणाऱ्या चढ-उतार व परिस्थितीला तोंड देत आदित्य सुरनर आखेर पोलिस झालाच, आदित्य सुरनर अमरावती येथे नोकरी वर जाण्यासाठी निघाला असता,महातपुरी गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख अमजद अफजल महातपुरीकर आणि सर्व गावकरी बांधवांनी भव्य सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या