अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेकडून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा सन्मान

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेकडून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा सन्मान

बीड जिल्हा प्रतिनिधी :- अलीकडच्या काही दिवसात बीड शहरात घडलेल्या विविध घटनांनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आपल्यातील कर्तव्यदक्षता व कणखरता दाखवत घेतलेले निर्णय, अंमलबजावणी आणि चोख नियोजन पाहता अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या बीड जिल्हा कार्यकारिणीसह जमाअत ए इस्लामी हिंद च्या संयुक्त विद्यमाने  सन्मानित करण्यात आले.
बीड शहरासह जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेसाठी ते करत असलेले कार्य ज्या तत्परतेने करीत आहेत त्यामुळे जनतेमध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावून विश्वास वाढू लागला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी बशीरगंज भागात अंधाराचा फायदा घेऊन दोन गटातील भांडण, बलभीम चौकातील भांडण किंवा कालिका नगर भागातील भांडणात तलवारबाजी व गोळीबाराने सर्वसामान्य जनतेत पसरलेली भीती असो. या प्रत्येक घटनेनंतर एस.पी. साहेबांनी लोकोपयोगी घेतलेले निर्णय, त्याची अंमलबजावणी आणि चोख नियोजनामुळे तिन्ही प्रकरणावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही आणि शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. यामुळे एस.पी. साहेबांचे आभार व्यक्त करण्याकरिता अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, उपाध्यक्ष डॉ. शेख एजाज़, पाटोदा तालुक्यातील संघटनेचे मार्गदर्शक तथा पत्रकार पठाण हमीद खान, तालुकाध्यक्ष सतीश गर्जे, अशोक भिसे आणि जमाअत ए इस्लामी हिंद चे बीड जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सय्यद शफीक हाश्मी यांनी शाल, पुष्पगुच्छ व आदाबे ज़िंदगी पुस्तक देऊन सन्मानित केले.

 पदाधिकाऱ्यांच्या मागण्या 

बीड शहरातील बंद पडलेल्या सर्व पोलीस चौक्या पूर्ववत सुरू करून.शहराचे वाढते क्षेत्रफळ लक्षात घेऊन नवीन पोलीस चौक्यांचे निर्माण करण्याची गरज.एस.एम.युसूफ़

तरुण युवा पिढीला नशा मुक्त करून, होणारे अघटीत प्रकार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलावे.डॉ. शेख एजाज़

पाटोदा पोलीस ठाणे जवळ असलेल्या गृह विभागाच्या मोकळ्या जागेवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चांगली मोठी प्रशस्त वसाहत निर्माण करावी.- पठाण हमीद खान.

पाटोद्यात पोलीस वसाहत लवकरात लवकर तयार व्हावी याकरिता संघटनेच्या माध्यमातून चळवळ उभी करून लढा देणार.- सतीश गर्जे

तरुण रात्री अपरात्री मुख्य रस्त्यावरून गल्लीबोळात विनाकारण फिरत असल्याने वेळेचे बंधन घालण्यात यावे - शफीक हाशमी

पहिल्यांदा रात्री घडलेली मारहाणीची घटना पाहता पोलीस प्रशासनाने रात्री दहा वाजता सर्व दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या बंद करण्यासाठी उचललेल्या पावलामुळे मध्यरात्री दोन-दोन वाजेपर्यंत रस्त्यावर मिरवणाऱ्या तरुणांनी पोलीस गस्तीचा धसका घेऊन मेन रोड आणि मेन चौकातून आपला मुक्काम आता गल्लीबोळात हलवल्याने आता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त घालताना गल्ली बोळांकडे सुद्धा मोर्चा वळवावा व घराबाहेर गल्लीबोळात अर्ध्या रात्रीपर्यंत जागून स्वतःसह इतर रहिवाशांची झोप खराब करणाऱ्या तरुणांना आपापल्या घरी धाडण्याची सक्ती करावी. जेणेकरून आपल्या देशाची भावी पिढी रात्री अकराच्या आत झोपून पहाटे पाचला उठेल आणि आपापले धर्म, जाती व प्रथेनुसार धार्मिक संस्कार व व्यायाम करून शिक्षण, व्यवसाय चांगले करतील. असे झाले तर जनता पोलीस प्रशासनाचे शतशः आभार मानेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या