धार्मिकसेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे यश
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण
लाखो वारकऱ्यांना दिलासा
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.
यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.
वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे
अशा प्रकारची माहिती राज्य सरकारने दिली आहे तर वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने नऊ दहा तारखेला परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले होते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते या सर्वांच्या नावाने निवेदन देऊन राज्य शासनाला वारकरी अपघाती संरक्षण विभाग विमा आर्थिक मदत म्हणून जाहीर करा असे निवेदन दिले होते ते निवेदन राज्य सरकारने तात्काळ आषाढी वारीसाठी जाहीर केल्याबद्दल राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांचे सर्वांचे जाहीर आभार जाहीर धन्यवाद आणि शासकीय प्रशासनाचे सहकार्य करणाऱ्यांचे हार्दिक सर्वांचे स्वागत
ची माहिती वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा जय हरी जय वारकरी

0 टिप्पण्या